Government youth registration : आता तरुणांना सरकार देणार 15,000 रुपये, पोर्टल सुरू; असं करा रजिस्ट्रेशन
सरकारने तरुणांना त्यांच्या पहिल्या नोकरीवर १५ हजार रुपये देण्यासाठी काम सुरू केले आहे. पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजना पोर्टल लाईव्ह करण्यात आले आहे. आता या पोर्टलवर योजनेचा लाभ घेण्यासाठी तरुण नोंदणी करू शकतात.
खासगी क्षेत्रात पहिल्यांदा नोकरी करणाऱ्या तरुणांना १५००० रुपये अनुदान मिळेल.
मुख्य मुद्दे : –
३.५ कोटी तरुणांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होणार आहेत.
Government youth registration : योजना १ ऑगस्ट २०२५ ते ३१ जुलै २०२७ या कालावधीत लागू असेल.
काय आहे पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजना
या योजनेंतर्गत खासगी क्षेत्रात पहिल्यांदा नोकरी करणाऱ्या तरुणांना १५००० रुपये दोन हप्त्यांमध्ये दिले जातील.
>>>> Great Job Opportunity 2025 – Paytm कंपनीत Marketing Executive पदांसाठी मोठी भरती सुरू आहे.
पहिला हप्ता ७५०० रुपये सहा महिन्यांच्या नोकरीनंतर आणि दुसरा हप्ता १२ महिन्यांच्या नोकरीनंतर मिळेल.
ही रक्कम थेट कर्मचाऱ्यांच्या ईपीएफओ खात्यात जमा होईल.
याशिवाय बचत करण्याच्या सवयीला प्रोत्साहन देण्यासाठी काही रक्कम ठराविक कालावधीसाठी ठेव खात्यात जमा केली जाईल जी नंतर काढता येईल.
कोण पात्र आहे?
Government youth registration : ही योजना खासगी क्षेत्रात पहिल्यांदा नोकरी करणाऱ्या तरुणांसाठी आहे. यासाठी काही अटी आहेत
लाभार्थ्यांचा मासिक पगार एक लाख रुपयांपेक्षा कमी असावा.
लाभार्थ्यांचे नाव ‘ईपीएफओ’ किंवा Exempted Trust मध्ये १ ऑगस्ट २०२५ पूर्वी नोंदलेले नसावे.
किमान सहा महिने एकाच कंपनीत नोकरी करणे आवश्यक आहे.
कशी लागू होणार ही योजना
ही योजना दोन भागांमध्ये लागू केली जाईल:
पहिल्या भागात: १ जुलै २०२५ नंतर ते ३१ जुलै २०२७ दरम्यान पहिली नोकरी मिळवणाऱ्या तरुणांना सरकार १५,००० रुपयांची मदत देईल.
दुसऱ्या भागात: नोकरी देणाऱ्या कंपन्यांनाही नोकरी देण्यासाठी सरकार आर्थिक मदत करेल.
असे मिळतील १५ हजार रुपये
Government youth registration : या योजनेत नवीन नोकरी मिळालेल्या तरुणांना दोन हप्त्यांमध्ये १५,००० रुपये दिले जातील.
ही रक्कम आधार ब्रिज पेमेंट सिस्टम (ABPS) वापरून थेट लाभ हस्तांतरण (DBT) पद्धतीने दिली जाईल.
नोकरी देणाऱ्यांना असे मिळतील ३,००० रुपये
नोकरी देणाऱ्या कंपन्यांना प्रत्येक नवीन कर्मचाऱ्यासाठी दरमहा जास्तीत जास्त ३,००० रुपयांपर्यंतची प्रोत्साहनपर रक्कम दिली जाईल. हे पैसे नियोक्त्यांना त्यांच्या थेट पॅन-लिंक्ड खात्यांमध्ये जमा केले जातील.
असं करा रजिस्ट्रेशन
नोकरी देणारे आणि पहिल्यांदा नोकरी करणारे कर्मचारी पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजना पोर्टल वर जाऊन नोंदणी करू शकतात.
▪️https://pmvbry.epfindia.gov.in
किंवा
▪️https://pmvbry.labour.gov.in
किंवा
▪️’उमंग’ ॲपवर आपला युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) टाकूनही या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्या तरुणांना उमंग ॲपवर उपलब्ध फेस ऑथेंटिकेशन टेक्नॉलॉजी (FAT) द्वारे युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) तयार करावा लागेल.
बातमी नक्की शेअर करा
